
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृह येथे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस जी यांच्या मुख्य उपस्थितीत विधानपरिषद निवडणुकीसाठी 'विजय संकल्प मेळावा' संपन्न झाला. सदर मेळाव्याला भाजपाचे नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहिलो. सदर मेळाव्यात मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांना विजयी करण्याचे आवाहन फडणवीस जी यांनी केले.
'मुंबई पदवीधर मतदार संघ-निवडणूक २०२४'निमित्त आज भाजपा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान भाजप उमेदवार म्हणून मुंबईसाठी केलेला संकल्प आणि ही निवडणूक आपल्यासाठी विशेषतः मुंबईसाठी का महत्त्वाची आहे यासंदर्भात उपस्थितांना संबोधित केले...