मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न. परंतु, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहता, बर्याच मुंबईकरांना आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. म्हणूनच परवडणार्या किमतीत मिळणारी घरे सर्वसामान्य पदवीधर मुंबईकरही सन्मानजनक पद्धतीने विकत घेऊ शकतो आणि आपल्या कुटुंबासोबत मुंबईतच राहू शकतो. त्याला मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही. त्यासाठी-
- गरज आहे ती सुयोग्य धोरण निर्मितीची व परिणामकारक अंमलबजावणीची.
- पुनर्विकासामध्ये इमारतींच्या दीर्घकालीन देखभालीसाठी लागणारा निधी विकसकाकडून सुरक्षित करणे.
- पुनर्विकासात फ्लॅटधारकांना मिळू शकणार्या संभाव्य लाभांबाबत जागृती व पारदर्शकता आणणे.
- स्वयंपुनर्विकासासारख्या पर्यायांसाठी धोरण साहाय्य व कृती आराखडे तयार करणे.
- ‘रेरा’सारखे कायदे योग्य अंमलबजावणीच्या दृष्टीने व फ्लॅटधारकांच्या हिताच्या दृष्टीने अपडेट करत राहणे.