स्वस्थ कुटुंब, निश्चिंतपणे काम करणारा मुंबईकर, कर्ता-सवरता मुंबईकर चांगल्या मानसिक स्वास्थ्याच्या आधारे उत्तम काम करून, आपले कुटुंब सन्मानाने सांभाळू शकतो. त्यासाठी प्राथमिक स्तरावरच आजारांशी लढा देणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी-
- कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे महापालिकेचे दवाखाने व रुग्णालयांच्या माध्यमातून प्राथमिक स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका व शासनाच्या आरोग्य विभागासह जागतिक व स्थानिक कॅन्सरसंदर्भात काम करणार्या विश्वसनीय संस्थांची मदत घेणे.
- मधुमेह, ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचे स्क्रिनिंग व समुपदेशन.
- उत्तम आरोग्य सुविधा हा मुंबईकरांचा हक्क आहे. महापालिका व शासकीय दवाखान्यांमध्ये मिळणार्या सुविधा जनसामान्यांना उत्तरदायी असल्या पाहिजेत. त्यांना मिळणार्या सेवांबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी क्यूआर कोडची व्यवस्था.
- नियम आणि कायद्यानुसार महिला कर्मचार्यांना भरपगारी प्रसुतीरजा मिळावी, यासाठी आवश्यक पाठपुरावा.
- आरोग्याचा संबंध मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेशीही आहे. आपल्या सफाई कर्मचार्यांचे व सोसायटीतील घनकचर्याच्या व्यवस्थापनाचे नीट नियोजन केले, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले, तर आरोग्याचा प्रश्न प्राथमिक स्तरावरच सोडवला जाऊ शकतो. लहानमोठ्या साथीच्या आजारापासून मुंबईकरांचे रक्षण केले जाऊ शकते.