मुंबई हे ‘रोजगाराचे शहर’ म्हणून ओळखले जाते. कोट्यवधी लोकांना मुंबई रोजगार देते. मुंबईकरांमध्ये कौशल्याची कमी नाही आणि मुंबईत रोजगाराचीही कमी नाही. गरज आहे या दोन्हीतले अंतर मिटवण्याची. त्यासाठी-
- प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दरवर्षी रोजगार मेळावा.
- शासनाच्या कौशल्य विकास केंद्रातून विविध कौशल्य विकास कोर्सेससाठी आग्रह.
- ‘वर्क फ्रॉम होम’ करू इच्छिणार्या मुंबईकरांसाठी सोसायट्यांमध्ये कौशल्य चाचपणी शिबिरे व प्रशिक्षणाची व्यवस्था.
- मातृभाषेतील शिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमांसाठी केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार काटेकोर अंमलबजावणीसाठी आग्रह
- शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदलांसाठी प्रयत्नशील.
- विद्यापीठातील परीक्षा, निकाल तसेच अन्य महत्त्वपूर्ण बाबींचे व्यवस्थित संचलन.
- स्टार्टअप्स, फिनटेक व उद्यमितेसाठी केंद्राच्या विविध योजना मुंबईकरांसाठी प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न.
- गुंतवणुकीच्या सुरक्षेसाठी धोरणात्मक रचनेची मागणी.
- रोजगाराभिमुख ‘स्टडीसर्कल्स’ची निर्मिती व ‘नॉलेज एक्सचेंज प्रोग्राम’.
- मुंबईत सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन.
- एशियाटिक सोसायटी लायब्ररी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांसारख्या वाचनालयांना, संस्थांना शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न.