आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घडत असलेल्या नव्या, आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीत मुंबईचे महत्व अनन्यसाधारण आहे. मुंबईला स्वतःचा चेहरा आहे. कोट्यवधी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणार्या मुंबईला गरज आहे, मुंबईचा आवाज महाराष्ट्राच्या विधान परिषदेत बुलंद करणार्या लोकप्रतिनिधीची! मुंबईच्या पायाभूत सुविधा, पर्यावरण, आपले अस्वच्छ किनारे, मोकळ्या जागांचा अभाव आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरांचे आरोग्य असे कितीतरी प्रश्न आज भेडसावत आहेत. बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता, पुढच्या काळात मुंबईकरांसमोर संकट असेल धर्मांधांकडून मुंबईचे रक्षण करण्याचे. या आणि अशा असंख्य प्रश्नांसाठी, मुंबईतील सुशिक्षित, सुजाण नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी, येथील रोजगारक्षम युवकांना कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची मी ग्वाही देतो. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे!
- जन्म : बीडीडी चाळ, वरळीत बालपणी वास्तव्य
- शालेय शिक्षण : मराठा हायस्कूल, वरळी
- महाविद्यालयीन शिक्षण : बी.ए. (मानसशास्त्र), एम.ए.(पत्रकारिता)
- बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक
- गेली 24 वर्षे मुंबईत मराठी पत्रकारितेतील अनुभव
- मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्य
- मुंबईतील सामाजिक, वन्यजीवविषयक, राजकीय कार्यात सहभाग